पैशाच्या किरकोळ वादातून एकाचा खून 36 वर्षे तरुणाचा करण्यात आला खून

 सासवड येथे पैशाच्या किरकोळ वादातून एकाचा खून 

36 वर्षे तरुणाचा करण्यात आला खून



सासवड दि.२०

 पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आलाय. सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या 36 वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणच नाव आहे. तर तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे...मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्या सोबत किरकोळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता.. या वादातून सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला. अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आलीय.. या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. असं पोलिसांकडून सांगण्यात येतेय ..दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.




दरम्यान या घटनेतील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन सासवड पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात सासवड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.