शिवव्याख्याते पत्रकार शिवदास शितोळे यांचा किल्ले पुरंदरवर सन्मान
छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रधान
प्रतिनिधी: श्रीक्षेत्र वीर तालुका पुरंदर येथील शिवव्याख्याते,लेखक, पत्रकार शिवदास शितोळे यांच्या लेखणीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यात त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार या सन्मानाने गौरांकित करण्यात आले.
हा सोहळा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केला होता यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, सिने अभिनेते किरण माने, प्रसिद्ध लेखक. देवा झिंझाड तसेच अभिव्यक्ती चॅनलचे संपादक रवींद्र पोखरकर यांच्या हस्ते हा विशेष सन्मान आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी तसेच अनेक शिवशंभूभक्त यावेळी उपस्थित होते. श्री शिवदास शितोळे हे शिवव्याख्याते, लेखक, पत्रकार म्हणून काम करत असून समाजातील चुकीच्या गोष्टींवरती आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम निष्पक्ष आणि निर्भीडपणे ते करत आहेत. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्याचेही सदस्य असून नाट्य चित्रपट कला क्षेत्राशी ही ते निगडित आहेत. लवकरच ते युवा पिढीसाठी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक बल संपादन करून आपल्या ध्येयापर्यंत कमीत कमी वेळेत कसे पोहोचावे हे शिव विचाराच्या माध्यमातून सांगणारे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या! पण कशासाठी? या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. भले तरीही देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती मारू काठी. या उक्तीप्रमाणे आपल्या लेखनातून समाजातील विविध चुकीच्या चालीरीती, अंधश्रद्धा तसेच अवैध व्यवसाय ,समाजामध्ये चाललेले बेकायदेशीर व्यवसाय यांच्या विरोधात आपल्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता अभ्यासपूर्ण निष्पक्ष, निर्भीड आणि कडक शब्दात प्रहार करून प्रशासनाला धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याचे जाणीव करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या तसेच उद्योजकांच्या यशोगाथाही त्यांनी त्यांच्या शब्दात समाजासमोर मांडल्या आहेत. ग्रामीण भागातील विविध गावातील आरोग्य, वीज,पाणी ग्रामपंचायत मधील गैर कारभार देवस्थान ट्रस्ट मधील सावळा गोंधळ तसेच मस्तवाल गाव पुढाऱ्यांचे कारनामे सुद्धा त्यांनी आपल्या साडेतोड लेखणीतून मांडल्या आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटक श्री शिवदास शितोळे यांच्याकडे आशेने बघत असून जनतेच्या बाजूने कोणीतरी बोलणारे आपले हक्काचे माणूस आहे ही भावना सर्वसामान्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे. पुरंदर किल्ल्यावरती आलेल्या सर्व शंभू भक्तांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाप्रसादाचेही व्यवस्था केली होती. या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे सागर नाना जगताप, संतोष हगवणे, अजय सावंत, अमोल काटे तसेच विविध पदाधिकारी शिवशंभुभक्त यावेळी उपस्थित होते.
अन्याय करणे पाप आहे तर दुसऱ्याने केलेला अन्याय सहन करणे महापाप आहे.
समाजामध्ये आज अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत असून आपण फक्त डोळ्यांनी मूकपणे पाहत सहन करतो त्यामुळेच अन्याय करणाऱ्याला बळ मिळत असते. ही भूमी अन्यायाविरुद्ध लढून कधीही हार न मानणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. या भूमीला शुरांचा ,वीरांचा वारसा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांनी कसलीही भीती न बाळगता चुकीच्या गोष्टींच्या विरोधात ठामपणे उभे राहून त्याचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी आपण चित्रण करून प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला कळवू शकतो फक्त मनामध्ये हवी थोडी धमक . परंतु दुर्दैवाने या शूरवीरांच्या भूमीमध्ये आज अनेक जण भित्रेपणाने अन्याय सहन करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.तरीही काही जण आज चुकीच्या गोष्टींचा विरोधात दंड थोपटून कडा प्रहार करत आहेत हेही आशादायकच म्हणावे लागेल. असे शिवव्याख्याते पत्रकार शिवदास शितोळे यांनी सांगितले.