एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या.

 एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या.

औरंगाबाद येथील घटना 



औरंगाबाद दि.२२


औरंगाबाद येथे एकतर्फी प्रेमातून विध्यर्थिनीचा खून करण्यात आला आहे. आरोपी शरणसिंग सेठी वय २० रा. भीमपुरा या तरुणाने शनिवारी भरदिवसा एका विद्यार्थिनीचा तिच्या मैत्रिणीसमोर गळा कापून खून केला. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाजवळील रचनाकार कॉलनीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.


  सुखप्रीतसिंग कौर उर्फ कशिश प्रीतपालसिंग ग्रंथी वय १९ असे मयत तरुणीचे नाव आहे. शरणसिंग तीन महिन्यापासून तिचा पाठलाग करीत होता. मात्र तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. अखेर शनिवारी तरुणीला कॅफेतून बाहेर काढत त्याने तिची क्रूरपने हत्या केली व आरोपी फरार झाला.


उस्मानपुरयातील आई, वडिल व दाेन भावांसह राहणारी सुखप्रितसिंग देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकत हाेती. आराेपी शरणसिंग हा मागील सात ते आठ महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता. माझ्याशी मैत्री कर, प्रेम कर असा हट्ट ताे करत असे. सुखप्रितसिंगने मात्र त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. फार त्रास झाल्यावर तिने घरी सांगितले. तिच्या कुटूंबाने देखील शरणसिंगला समजून सांगितले होते. शनिवारी (२१ मे) सुखप्रितसिंग आपल्या दोन मैत्रीणींसह महाविद्यालयात गेली. दुपारी दोन वाजता मैत्रीण दिव्या खटलाणीसोबत ती काॅलेजजवळील रचनाकार कॉलनीतील कॅफेमध्ये गेली. तेथे शरणसिंग आला व त्याने तिच्याशी बाेलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या आराेपीने सुखप्रितसिंगला कॅफेबाहेर आणले व बळजबरीने ओढून मोकळ्या जागेवर नेले. काहीतरी अघटित घडण्याची शंका आल्याने मैत्रिण दिव्याही त्यांच्या पाठीमागे जात हाेती. त्याचवेळी शरणसिंगने आपल्याजवळील शस्त्र ‘कुरपाण’ काढले व सुखप्रितसिंगच्या गळ्यावर वार केले. काही क्षणात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. हा प्रकार पाहून दिव्याने आरडाओड केली. स्थानिकांनी धाव घेतली. दिव्याने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. पंधरा मिनिटांनी रुग्णवाहिकेतून सुखप्रितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..