कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी. निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित.

कर्तव्यात तत्पर नेतृत्व! २४ तासांत पाणी योजना पुन्हा सुरू; उपसरपंच राजेश काकडे यांची धडाडी. 


निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा झाला होता खंडित. 



पुरंदर :

        पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकित बिलामुळे खंडित झाल्यानंतर गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र उपसरपंच राजेश काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांच्या तत्परतेमुळे अवघ्या २४ तासांतच वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. 


       निरा शिवतक्रार गावात शुक्रवारी अचानक पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे वीजबिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित केला होता. परिणामी गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. 


    मात्र, अशा संकटाच्या वेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीने पुढाकार घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा केला. त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांचीही भक्कम साथ लाभली. 


       दोघांच्या समन्वयातून व अथक प्रयत्नांमुळे अवघ्या २४ तासांच्या आतच पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यश आले. गावातील नळ पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला. 


       निरा शिवतक्रार मधिल गावकऱ्यांमध्ये याबाबत समाधानाची भावना असून “बोले तैसा चाले त्याचे नाव राजेश काकडे” अशा शब्दांत उपसरपंचांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. संकटकाळात नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण राजेश काकडे यांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 


      दरम्यान, भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या तरी गावात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधाना

चे वातावरण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई