पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात 



पुरंदर : 

      पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून खरी निवडणूक लढत सुरू झाली आहे. एकूण ८७ अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८ जागांसाठी विविध पक्षांचे व अपक्ष असे ३३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आगामी ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


      पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि. २७) हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज वैधतेनंतर तब्बल पाच दिवसांची मुदत मिळाल्याने विविध पक्षांतील नाराज उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. या काळात अनेक 'अर्थपूर्ण' राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. 


     आता पंचायत समितीच्या ८ गणांसाठी ३० पक्षीय आणि ३ अपक्ष असे एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून, प्रत्येक गणात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 


मतदारसंघनिहाय स्थिती :

गराडे गण (सर्वसाधारण महिला)

या गणात तिरंगी लढत रंगणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – अर्चना ज्ञानेश्वर कटके,

 भाजप – ललिता दिलीप कटके

शिवसेना – सुप्रिया विशाल रावडे 


दिवे गण (नागरिकांचा मागासवर्ग)

प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.

भाजप – देवीदास संभाजी कामथे

राष्ट्रवादी काँग्रेस – अमित भाऊसाहेब झेंडे

शिवसेना – बाळासाहेब दगडू मगर 


माळशिरस गण (सर्वसाधारण)

या गणात सर्वाधिक उमेदवार असून बहुरंगी लढत अपेक्षित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – अजिंक्य रामदास कड

काँग्रेस – हनुमंत मुरलीधर काळाणे

आप – संदीप श्रीरंग चौंडकर

शिवसेना – शरद बाळासाहेब यादव

भाजप – ज्ञानोबा आप्पा यादव 


बेलसर गण (सर्वसाधारण)

येथे पाच उमेदवार निवडणूक लढवत असून अपक्ष उमेदवारही लक्षवेधी ठरत आहेत.

काँग्रेस – कुशाल संजय कोलते

भाजप – कैलास पंढरीनाथ जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस – निलेश कृष्णा जगताप

शिवसेना – माणिक बाळासो निंबाळकर

अपक्ष – सुहास नवनाथ खेडेकर 


वीर गण (सर्वसाधारण)

या गणात सर्वपक्षीय व अपक्षाचा सहभाग असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे.

शिवसेना – प्रविण बाळासाहेब जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस – उत्तम महादेव धुमाळ

काँग्रेस – महेश चंद्रकांत धुमाळ

भाजप – सुधीर शिवाजीराव धुमाळ

अपक्ष – किशोर विश्वास वचकल 


भिवडी गण (न.मा. प्रवर्ग महिला)

येथे महिला उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – अनुजा अमोल पोमण

शिवसेना – पुजा सागर मोकाशी

भाजप – सायली मनोज शिंदे 


कोळविहीरे गण (सर्वसाधारण महिला) 

चार प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात असून लढत अटीतटीची होणार आहे.

काँग्रेस – रत्नमाला दिलीप खैरे

राष्ट्रवादी काँग्रेस – स्मिता संतोष निगडे

भाजप – सिमा भाग्यवान म्हस्के

शिवसेना – शितल सतिश साळुंके 


निरा गण (अनुसूचित जाती महिला)

या गणात पाच उमेदवार असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – मोनीका स्वप्नील कांबळे

शिवसेना – रेखा नितीन केदारी

भाजप – वंदना बाळासाहेब भोसले

काँग्रेस – गीता शुद्धोधन सोनवणे

अपक्ष – अर्चना देविदास भोसले 


      अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालेल्या चित्रामुळे आता पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणूक खऱ्या अर्थाने रंगात आली असून, प्रत्येक गणात चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाला कौल देणार, हे ७ फेब्रुवारीला निकालानंतर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.