लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी



लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी 


लोणंद, २७


लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावकलवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली असून याप्रकरणी लोणंद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावकलवाडी ता खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील महादेव पांडुरंग शेंडगे यांच्या घराचे कुलूप दि. २६ रोजी भरदिवसा अनोळखी तीन चोरट्यांनी तोडून घरातील बेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे एक लाख पंचेचाळीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद महादेव शेंडगे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालसिम व लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..