Type Here to Get Search Results !

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू

 पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे दोघांच्या पोटात खुपसला चाकू



 सासवड दि.२२


    पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यामध्ये दोघा भावांच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केल असून जेजुरी पोलिसात या संदर्भात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद विशाल अनंत कड यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जालिंदर चौंडकर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ संतोष कड यांना जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या पोटामध्ये प्रत्येकी दोन वेळा चाकू खुपसून गंभीर जखमी केले.  याबाबतची फिर्याद त्यांनी जेजुरी पोलिसात दिली असून या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307, 323 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला


  याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26 /6 /2023 रोजी सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारास फिर्यादी आणि गावातील वायरमन बाबुराव आवळे, मधुकर राजारा कड असे तिघे गावातील शिवशंभू हॉटेल समोर उसाचा रस पीत असल्यास बसलेले असताना त्यावेळी आरोपी जालिंदर चौंडकर  आणि त्याची मुलगी मोटरसायकल वरून येथे आले मुलीला हॉटेलमध्ये ठेवून जालिंदर लगेचच बाहेर आला आणि फिर्यादी यांच्याकडे बघून म्हनाला की, मला तीन-चार वर्षांपूर्वी तू नडला होता. त्यावर फिर्यादी आरोपीला म्हणाले की, तू आता तुझ्या मुली सोबत आलेला आहेस तु घरी जा. मात्र तरी देखील आरोपीने त्यांच्या अंगावर धावून येऊन त्यांचे कॉलर पकडले त्यावेळी दोघांमध्ये  धक्काबुक्की झाली.त्यावेळी मधुकर कड आणि आवळे वायरमन यांनी भांडण सोडवले . यानंतर तो मुलीला घेऊन दमदाटी करत निघून गेला. आज तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून तो गेला. यानंतर फिर्यादी हे त्यांच्या शेतात गेले सायंकाळी सहा वाजले तर सुमारास त्यांचा चुलत भाऊ संतोष बाळासों कड  यांनी फिर्याद यांना फोन करून सांगितले की, जालिंदर हा घरी आला आहे आणि तो बाया माणसांना शिवीगाळ करत आहे. यानंतर ते ताबडतोब शेतातून घरी आले. त्यावेळी जालिंदर हा निघून गेला होता. त्यांच्यासोबत मधुकर कडे होते त्यावेळी संतोष हा गावात गेला होता. मधुकर कड यांना सोडवण्यासाठी  फिर्यादी   नायगाव येथे आले असता त्यांनी त्यांना चौकात सोडले. त्यावेळी जालिंदर चौकत  होता. हातात चाकू घेऊन तो त्यांच्याकडे पळत आला आणि तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून काही समजण्याच्या आतच त्याने त्यांच्या हातातील चाकू दोन वेळा फिर्यादींच्या पोटात दोन वेळा खुपसला. यामध्ये त्यांचे आतडे बाहेर निघाले. त्यावेळी त्याला धरण्यास संतोष कड हा आला असता त्याला देखील त्याने त्याच्या हातातील चाकू दोन वेळा पोटात खुपसून गंभीर जखमी केले. यानंतर ते दोघेही बेशुद्ध पडले यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले. याबाबतची फिर्याद जेजुरी पोलिसात देण्यात आली असून या संदर्भातील अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies