Type Here to Get Search Results !

वीज वितरणाच्या खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

 वीज वितरणाच्या खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू 

बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक



 बारामती दि.५


         वीज वितरणाच्या खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका महावितरण कर्मचाऱ्यासोबत एक शेतकरी विजेच्या खांबावर चढला असताना त्याला विजेचा धक्का लागला. यात या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायाला लावले. विजेचा प्रवाह सुरू असताना संबधित शेतकऱ्याचा हात विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला लागला आणि तो शेतकरी खाली कोसळला. या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विजय मुरलीधर गवळी (वय ५५) असे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या घटनेनंतर शेतकऱ्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महावितरण कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी असलेल्या विजय गवळी यांना खांबावर चढता येत असल्याने वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास सांगितले. मात्र खांबावर चढल्यानंतर तारेतून विजेचा प्रवाह सुरू होता. त्या तारेला शेतकऱ्याचा हात लागला. आणि शेतकरी खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.


त्यानंतर त्याला संबधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्हीही कर्मचारी गायब झाले असून जोपर्यंत त्यांचेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

'अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार'


झालेली घटना दुर्दैवी आहे. ज्यावेळेस एखादा वीज अपघात होतो त्यावेळेस आम्ही विद्युत निरीक्षकाला माहिती देतो. त्यानंतर त्याचा अहवाल येतो. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.


  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies