नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १४७ उमेदवारांचे अर्ज दाखल
नीरा दि.३
पुरंदर तालुक्यातील १०५ व बारामती तालुक्यातील ३२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत .त्यामुळे १८ जागांसाठी १४७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
नेहमीच बिनविरोध होणाऱ्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता उमेदवारीसाठी मोठी चढाओढ लागली आहे. तालुक्यातील अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे.आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी,
उद्धव शिवसेना,बाळासाहेबांची शिवसेना, भाजप,आम् आदमी पार्टी आणि शेतकरी संघटना अशा सर्वांनीच आपले उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काही पक्षांना संपूर्ण पॅनल उभा करता आला नसला तरी काही जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आले आहे.
आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जा नुसार
सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण साठी ६९
महिलासाठी १० ,इतर मागास विभागातून १३, भटक्या विमुक्त जाती जमाती ११ असे एकूण १०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटात २४
अनुसूचित जाती जमाती ५ आर्थिक दृष्ट्या मागास ३ असे एकूण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
आडते व्यापारी मतदार संघात ९ तर
हमाल तोलारी मतदास संघात ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
शासनाच्या शेतकरयांना निवडणूक लढवण्यासाठीच्या धोरणामुळे यावेळी सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य नसलेले पण कार्यक्षेत्रात असलेल्या ३७ शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकंदरीतच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त असली तरी अर्ज माघारी घ्यायची दिवशीच याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होईल.
सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघाचा विचार केल्यास आघाडीकडे जादा मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इतर पक्षांनी जरी उमेदवार दिले असले तरी मतदार सीमित असल्याने सध्या तरी आघाडीचे पारडे या निवडणुकीत वरचड
आहे.