पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी

 पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी




सासवड दि.९


पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे  रुंदीकरणाचे काम सध्या चालू आहे. परंतु महामार्गावर  सूचनाफलक यांचा अभाव असल्याने  महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे. त्यातच अनेक ठिकाणे रस्ते एकदमच वळवले जातात. रविवारी पहाटे असाच रस्त्याचं अंदाज न आल्याने एक कार रस्त्यावरून खाली गेली आणि  खड्यात पडली.  यामध्ये दोन वृध्द गंभीर जखमी झाले. साकुर्डे  गावानजीक भोंगळे माळा येथे हा अपघात घडलाय





   सुदैवाने कोणाला मोठी   पुरंदर तालुक्यातील साकुर्डे  गावा भोंगळे मला येथे इको कार खड्ड्यात गेल्याने इको कारमधील ज्येष्ठ नागरिक यांच्या गंभीर दुखापत झाली आहे.MH 12 HF 8165 ही ईकोकार वडगाव ता.माण येथून पुणेकडे जात असताना रात्रीच्या वेळी अचानक रस्ता अरूंद झाला. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकल्याने इको कार महामार्गाकडील खड्ड्यात कोसळली या अपघातात कारमधील ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व अपघाताबाबतीत हे जेष्ठ नागरिकांचे नातू अभिमन्यू माळवे यांनी माहिती दिली.


      जेजुरी ते सासवड  या दरम्यान सध्या महामार्गाचे काम सुरू आहे .अनेक ठिकाणी रस्ते वळवण्यात आले आहेत पण ठेकेदाराने बोर्ड नीट नाl लावल्याने ते दिसत नाहीत आणि असे अपघात होत आहेत.


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..