- अत्यंत हृदयद्रावक घटना ! पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू ...
बारामती दि.२७ (प्रतिनिधी) न्युज मराठी
बारामती तालुक्यातील चोपडज (गायकवाड वस्ती) येथे ३ वर्षाच्या लहान मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यु झाला आहे .समर्थ रमेश गायकवाड या. बालकाच नाव आहे. घरासमोर खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून या मुलाचा मृत्यू झाला.
काल दि २६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडज येथील गायकवाड वस्ती येथे रमेश गायकवाड यांनी घरामागे नवीन बांधकाम करण्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी खड्डा खांदला होता. काल दुपारच्या वेळी समर्थ याठिकाणी खेळता खेळता पाण्यात पाडला. घरच्यांनी अनेक ठिकाणी शोधधोध केल्यावर पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.