दिवे घाटात टेम्पो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर १९ जण जखमी
सासवड दि.१७
बांधकामाचे साहित्य घेऊन पुण्याकडे जात असलेला एक टेम्पो दिवे घाटात पलटी झालाय..यामध्ये १९ कामगार जखमी झालेत. एक जनाचा मृत्यू झालाय. दिवे घाटातून पुण्याकडे जात असताना दुसऱ्या वळणावर सकाळी हा अपघात घडलाय ...
या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार बंधामाचे साहित्य व कामगारांना घेऊन टेम्पो सासवडहून पुण्याकडे जात होता. दिवे घाटातील दुसऱ्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. त्यातील सर्व साहित्य आतील कामगारांच्या अंगावर पडले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय तर १९ कामगार जखमी झालेत.जखमी पैकी ४ जणांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात तर १५ जणांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आलंय..
माजी सैनिकांनी केली मदत
दरम्यान हा अपघात घडलं तेव्हा माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर सह सचिव संतोष लक्ष्मण झिंजुरके हे तिथे होते.अपघातानंतर त्यांनी अपघात ग्रस्थांना मोलाची मदत केली. जमखमी कामगारांना इतरांच्या मदतीने बाहेर काढले.अपघाताची माहिती सासवड पोलिसांना दिली.जखमींना उपचारासाठी खाजगी वाहनातून पुढे पाठवले त्याच बरोबर काही जखमींना उपचारासाठी सासवड येथे देखील आणले.....यावेळी त्यांना तेथील प्रवाशांनी देखील साथ दिली..त्यामुळे १९ लोकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली...