Type Here to Get Search Results !

'पठाण' चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही"; भाजपच्या 'या' मंत्र्याने दिला इशारा

 


सध्या शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या 'पठाण' चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

मात्र त्या अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि यातील गाणी सध्या रिलीज केली जात आहेत. 2 दिवसांपूर्वी चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं प्रदर्शित झाले आणि आणखी एक नवीन वाद निर्माण झाला. यानंतर लोकांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

काय आहे या गाण्यात?
या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. शाहरुख खान आणि दीपिकावर हे गाणं चित्रित झालं आहे. मात्र या गाण्यात दीपिकाने एक केशरी रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत 'बेशरम रंग', यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदू महासभेने या गाण्यावर आणि दीपिकाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता भाजपा नेत्यानेही चित्रपटावर टीका केली आहे.

भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांचा इशारा

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या 

बोलांवरही आक्षेप घेतला आहे. "'पठाण' हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. '

बेशरम रंग' गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल 

करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय 

आम्ही घेऊ," तसेच त्यांनी दीपिकावर चित्रित करण्यात आलेले काही सीन्स बदलण्याची मागणी केली 

आहे. जर असे न केल्यास मध्य प्रदेशमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारादेखील 

नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies