सोमुर्डी येथे शेतात खांब रोवण्यावरून मारामारी चार जना विरोधत सासवड पोलिसात फिर्याद दाखल
सासवड दि.२८
पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथे शेतामध्ये खांब रोवण्याच्या वादातून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324,323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात सोमुर्डि येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महिला सुनंदा मारुती कुराडे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता व पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी पाडुरंग काळुराम जगदाळे, गणेश बाळु जगदाळे , सोमनाथ भाऊ जगदाळे तिघे रा. गराडे ता. पुरंदर जि पुणे व अजीत लक्ष्मण कु-हाडे रा. सोमर्डी ता पुरंदर जि पुणे
यांनी गट नंबर५०४ मध्ये पोल रोवल्याच्या कारणावरून फिर्यादी याना कळकाचे काठीने डोक्यात व पाठीवर मारहाण केली.त्याच बरोबर त्यांचे पती हे भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही काठीने मारहाण केली व शिविगाळ दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची फिर्याद दिली आहे. याबाबत अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.