वाल्हे येथे उद्या पासून सुरू होणार "भैय्यासाहेब खाटपे चषक २०२२" क्रिकेट सामने .

 वाल्हे येथे उद्या पासून सुरू होणार "भैय्यासाहेब  खाटपे चषक २०२२" क्रिकेट सामने .



  नीरा  दि.१

   पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे उद्यापासून  भैय्यासाहेब चषक क्रिकेट सामने सुरू होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे  यांच्यावतीने  भव्य क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

        खुल्या गटात हे सामने होणार असून विजेत्या संघाला ७१ हजार  रुपये रोख व ट्रॉफी दिली जाणार आहे.तर उपविजेत्या संघाला ५१ हजार एक रुपयाचे रोख  व ट्रॉफी असे बक्षीस असणार आहे.त्याच बरोबर अन्य दोन संघांना सुध्दा तिसरे आणी चौथे बक्षीस

दिले जाणार आहे. यामध्ये तिसरे बक्षीस २१ हजार रोख व चौथे बक्षीस ११ हजार रोख असे असणार असल्याची माहिती  भैय्यासाहेब खतापे यांनी दिली आहे.

   उद्या सकाळी १० वाजता पाडव्याच्या मुहूर्तावर या सामन्याचे उद्घाटन  आमदार संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थित भोर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्याच बरोबर  सुरवातीचा सामना पोलीस विरुद्ध पत्रकार असा होणार असल्याचे खाटपे यांनी सांगितले आहे. 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.