कै.दिनकरराव सावंत स्मृति प्रतिष्ठानचे पुरस्कार. राहुल शिंदे व ह.भ.प. आनंद तांबे यांना करण्यात आले प्रदान
आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
सासवड प्रतिनिधी दि.१८
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या संस्था व व्यक्ती यांना गेली पंचवीस वर्षापासून कै. दिनकरराव सावंत स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार दिले जातात. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे तसेच पिंपरी - चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व ह. भ. प. आनंद तांबे यांना यंदाचे हे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पत्रकारितेतून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देणारे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषद, मुंबई संचलित पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष पत्रकार राहुल शिंदे, तसेच पिंपरी - चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व हरी भक्त परायण आनंद तांबे यांनी आपल्या किर्तनातून अनेक वर्षापासून केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले .आज दिनांक 18 एप्रिल रोजी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथील पुरंदर नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या पुरस्काराचा वितरण समारंभ पारपडला.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, सदस्य डॉ सुमित काकडे ,काँग्रेस राज्यकार्यकरिणीचे पदाधिकारी गणेश जगताप,माजी सरपंच संभाजी काळाने,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार,राष्ट्रीय खेळाडू माणिक पवार,नंदकुमार कामठे,विलास उंदरे, लक्ष्मण साळुंखे रविंद्र जोशी, नंदकुमार चव्हाण, गणेश जगताप, पत्रकार दत्तानाना भोंगळे, भरत निगडे,अमोल बनकर, अमृत भांडवलकर आदी उपस्थित होते .
पत्रकार राहुल शिंदे यांना पुरस्कार माळाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकर संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पत्रकर निलेश जगताप यांनी त्यांचे अभिंनदन केले.