Type Here to Get Search Results !

प्राजक्ता बोराडे यांना वै.इंदुमती पवार स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान

 


प्राजक्ता बोराडे यांना वै.इंदुमती पवार स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान

 

   


नीरा दि.७


   कृतज्ञता प्रतिष्ठान, पैलवान ग्रुप आणि गुरु हनुमान तालीम, शिवतक्रार-निरा यांच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा २०२२ हा प्राजक्ता बोराडे याना देण्यात आला आहे.पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 त्याच बरोबर कै. विश्वनाथ सपकाळ (गुरुजी) स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मा. वस्ताद बुवाजी लिमण यांना वस्ताद  प्रकाशशेठ सावंत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 



    

    नीरा नाजूक पिंपरे खुर्द येथील संकेत लॉन मंगल कार्यालयात मॅट वरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी झालेल्या कुस्ती स्पर्धेत   यामध्ये मोठ्या गटात पै. गणेश कोकरे यानी प्रथम क्रमांक मिळवला.दुसरा नंबर पै. आदर्श पाटील याने मिळवला  तीसरा नंबर पै. जय भांडवले,  महिलांच्या मोठ्या गटात.सांगलीची पै. प्रतिक्षा बागडी, हिने प्रथम.क्रमांक मिळवला लहान गटात. नीरा येथील पै. सार्थक शरद जगदाळे, याने विजय संपादन केला तर महिलांच्या लहान गटात नीरा येथील पै. मुक्ताई गिरीश सपकाळ, ही विजेती ठरली. या कुस्ती स्पर्धांमध्ये पन्नास उत्कंठावर्धक कुस्त्या झाल्या.

 यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष  प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे ,डॉ. स्वप्नील लाळे (सहसंचालक आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य), डॉ. महेंद्र जगताप (राज्य किटकशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य), दत्ताआबा चव्हाण, राजेश चव्हाण, अनिलअण्णा चव्हाण,  संदीप धायगुडे,राजेश काकडे, भैय्यासाहेब उर्फ प्रदीप खाटपे, पंढरीनाथ  पवार,राजाभाऊ जगताप,  रविंद्रपंत जगताप,कोमल  निगडे, पैलवान ग्रुप, निरा चे सर्व मान्यवर पदाधिकारी, पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व मान्यवर पदाधिकारी व इतर स्थानिक कुस्ती  शौकीन उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies