नीरा येथे विविध ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 नीरा येथे विविध ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी





  नीरा दि. १४

             नीरा (ता.पुरंदर) येथे आज विविध ठिकाणी  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

नीरा येथील ग्रामपंचायत कर्यालयात नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते  डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

          नीरा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दोन दिवस या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज सकाळी नीरा येर्थिल सर्वोदय   सोसायटीच्या प्रांगणात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर वार्ड नंबर चार मध्ये निरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे  व त्यांच्या मंडळाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन नीरा औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या हस्ते करण्यात आली  यावेळी नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे,ग्रामपंचायत सदस्य राधा माने, अभिषेख भालेराव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने, माजी उपसरपंच कुमार मोरे,विजय शिंदे, दीपक काकडे, राजेश चव्हाण, अॅड.आदेश गीरमे,  अॅड विजय, अमोल साबळे  यांसह अनेक नागरिक उपस्तीत होते. यावेळी बोलताना निरेचे उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की, बाबासाहेबांनी  घटनेच्या माध्यमातून सर्वत्र समता बंधुता आणि सर्व धर्म निर्पेक्षता आणण्याचा प्रयत्न केला आहे .बाबासाहेबांचे विचार आत्मसाद करत असताना सर्व  जाती,धर्माचा आदर आपण करायला हवा. त्याच बरोबर समता व बंधुभाव याचाही अंगीकार करायला हवा. 






Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.