जेजुरी गडावरील भंडारा करतोय भाविकांचा आरोग्यावर परिणाम
तर ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका
यात्रा जत्रा काळामध्ये भंडाऱ्यामध्ये होते मोठी भेसळ
भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी
पुरंदर
अवघ्या महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल जाते, ते म्हणजे जेजुरी मध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे. पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की, या भांडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशा सोन्यासारखी पिवळी होऊन जाते.. आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं.... मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरी येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय..... या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात आलय. त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय.....त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी. अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थांचे माजी मुख्यविश्वस्त शिवराज झगडे यांनी केलीय. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलंय. आणि ही भेसळ थांबण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केलीय...
यात्रा जत्रा काळात भंडाऱ्यामध्ये होते मोठ्या प्रमाणात भेसळ
कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक जत्रा यात्रा उत्सवामध्ये भंडारा आणि खोबरे याला अनन्य साधारण महत्व आहे .राज्यातून येणारा भाविकभक्त मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो. देवाच्या चरणी अर्पण करतो. तळीभंडारा ,जागरण गोंधळ, कोटांबा पूजन,लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करताना हा भंडारा कपाळी लावतो . प्रसाद म्हणून भाविक भंडारा ग्रहण करतो .काही भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर देवघरात ठेवून त्याच पवित्र्य जपतो. या सोनपिवळ्या भंडाऱ्यामुळेच "सोन्याची जेजुरी "हे नाव प्रचलित झाले आहे .मंगल कार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचे प्रतीक मानले जात... मात्र , गेल्या काही वर्षांपासून या भंडाऱ्याला भेसळीचे ग्रहण लागलेय ...."यलो पावडर म्हणजेच " नॉन ईडीबल" टरमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा विकला जातोय.....जत्रा यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर याची विक्री होते.या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे ,डोळे चुरचुरणे , त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात
भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे जेजुरगडाच्या दगडांवर होतोय परिणाम
सर्वात गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल, मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.... .गेली अनेक वर्षांपासून ही समस्या आहे.
याबाबत देवसंस्थानचे माजी प्रमुखविश्वस्त शिवराज झगडे,पत्रकार प्रकाश फाळके यांनी मुंबई येथे अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. .
हळद आणि कुंकवामध्ये भेसळ होत असल्याच्या अनेक तक्रारी : नरहरी झिरवळ
हळद आणि कुंकू यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून, याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. भेसळयुक्त भंडारा हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेत उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात येतील.असे आश्वासन नामदार झिरवाळ यांनी दिलय...यावेळी माजी प्रमुखविश्वस्त शिवराज झगडे यांचे हस्ते नामदार झिरवळ यांचा फुले पगडी, उपरणे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.



No comments:
Post a Comment