Type Here to Get Search Results !

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

सासवड येथे पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास केली अटक.

 ५गुन्हे उघडकिस तर ५ मोटार सायकल केल्या हस्तगत


 सासवड दि.३१

     पुरंदर तालुक्यातील सासवड येथे  दि. 30/07/2023 रोजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते...त्याच्याकडे चौकशी  केली  असता त्याने पाच मोटरसायकल चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांनी त्या पाचही मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत...

       याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  रविवारी   पोलीस हवालदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन तसेच वाहतुक कारवाई करीत असतांना दुपारी 3 वाजलेच्या सुमारास एक तरुण संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना आढळून आला. त्याचेकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेवुन त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या होंडा शाईन मोटार सायकल  बाबत विचारपुस केली असता त्याने  मोटार सायकल  बारामती  मधील रूई एम.आय.डी.सी परीसरातुन चोरलेली असल्याची कबुली दिली आहे. तसेच तो चाकण येथुन बारामती येथे घरी महिन्या दोन महिन्यातुन जात येत होता. पण गावी जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे होती. घरचे लोक गाडी घेवुन देत नव्हते. म्हणुन तो गाडया चोरून काही दिवस वापरून सोडुन देत असे. त्याने सासवड परीसरातुनही चार मोटार सायकल चोरल्या असलेबाबत बाबतची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्या सर्व मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत..अल्ताफ ईकरार स्ययद, अस या  वय 20 वर्षीय तरुणच नाव असून ते सध्या , रूई एम.आय.डी.सी, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. येथे राहतो तर  तो मुळचां   उत्तर प्रदेशचां असल्याचं त्यानं सांगितलय....

पोलिसांनी ताब्यात  घेतलेल्या मोटार सायकल 

 १) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.50.F.3931


२) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.QU.8092 

३) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.GW.2488 

४) होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं.MH.12.JY.5568 

५) होंडा शाईन मोटार सायकल नं.MH.42.AB.0327 



 ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी  भोर विभाग तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोश जाधव, पोलीस अंमलदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, जब्बार स्ययद, विशाल नगरे, शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांचे पथकाने केलेली आहे.                                       

     

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies