Type Here to Get Search Results !

अखेर चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी अभिनेत्रीचा घटस्फोटासाठी अर्ज, दीड वर्षात पती-पत्नीच्या नात्याला पूर्णविराम


 राठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झालेली मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

आता या चर्चा खऱ्या ठरल्या असून मानसी नाईकने याबाबत खुलासा केला आहे. 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमुळे तिने या चर्चा खऱ्या असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे म्हटले आहे.

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. तसेच एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट केले होते. तेव्हापासून दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले होते. दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या. घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या असून मी याबाबत खोटे बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला झाल्याचे मानसी नाईक हिने सांगितले आहे.

मी आता या क्षणाला खूपच दु:खी आहे. नेमके काय चुकले हे सांगणे आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत आणि हे सगळे खूपच वेगात घडले. पण आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचे आहे, असे मानसी नाईक म्हणाली.

एक वेळ अशी होती जेव्हा मला माझे कुटुंब हवे होत आणि मी तेव्हा लग्न केले. अर्थात तेही खूप घाईघाईत झाले. मला वाटते तिथेच काहीतरी चुकले. पण आता या लग्नाच्या नात्यातून वेगळे होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतेही महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचे होते, असेही ती म्हणाली.

मला आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझे कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक, चाहते हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला वाटतं आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि माझ्याबाबतीत हेच घडलं आहे. मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असे काहीच घडले नाही, असेही ती म्हणाली.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies