Wednesday, July 26, 2023

नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 नीरा येथे आरपीआयचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 


विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय साहित्याचे वाटप



नीरा दि.२७


    नीरा (ता. पुरंदर) येथे आज गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन, त्याचबरोबर पक्ष अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच तेजस्वी काकडे आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सफाई कर्मचारी महिलांना साडी चोळी देऊन  सन्मानित करण्यात आले.

        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन नीरा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पक्षाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन आज गुरुवारी देखील साजरा करण्यात आला. यावेळी नीरेच्या सरपंच तेजस्वी काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, संदीप धायगुडे, विजय धायगुडे,दादा गायकवाड, सचिन मोरे,



विजय शिंदे, नानासाहेब हेंद्रे, किरण सोनवणे, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या कामाबद्दल कौतुक केले. तर यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन. त्यांचा सन्मान करण्यात आला .त्याच बरोबर शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.तर पाडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवण देण्यात आले... 

   यावेळी आलेल्या मान्यवरांचे आभार आरपीआयचे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Featured Post

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्र...