Friday, July 21, 2023

पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

 पिंपरे येथील माथाडी कामगाराच्या  खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई 

पोलिसांनी एका महिले सह नऊ संशयितांना घेतले ताब्यात




 दि.२२


         पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री हा खून करण्यात आला होता.हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये झाला मृत्यू झाला होता. कोयत्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यातआला आहे.. हरिश्चंद्र थोपटे हे नीरा येथे माथाडी कामगार म्हणून काम करीत होते.


  दरम्यान या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी काल रात्री लगेच 9 जणांना ताब्यात घेतलंआहे. जेजुरी पोलीस या बाबत तपास करत आहेत . भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक सांडभोर आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून संशयितांना घटने नंतर अवघ्या तीन तासात जेरबंद केलं आहे. या घटने बाबत पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत.हे संशयित पिंपरे,नीरा,आणि पाडेगाव परिसरातील आहेत.तर यातील काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.


नवीन अधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी


पुरंदर तालुक्यातील जेजुरी, सासवड या पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. या ठिकाणी आता नवीन आणि तरुण अधिकारी रुजू झालेत.त्याचबरोबर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुद्धा नवीन अधिकारी आले आहेत हे सर्व अधिकारी तरुण तडफदार आहेत या अधिकाऱ्यांच्या बदली नंतरची ही मोठी घटना आहे. या घटनेचा तातडीने तपास लावण्यात या अधिकाऱ्यांना मोठ यश आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचं स्थानिकांकडून कौतुक होते आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

  नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले  रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप  नीरा : प्रतिनिधी       ...