सायकल स्पर्धेचे नीरेकरांनी केले स्वागत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धा.
पुरंदर :
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धा आज शनिवारी पारपडली. नीरा येथे सायकल स्वारांचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले. स्पर्धकांचे व आयाजक संदिप कदम यांचे स्वागत हल्लीच्या निनादात मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२५ चे आयोजन केले होते. पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, समर्थ पतसंसथेचे चेअरमन राजेश चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, सरचिटणीस राजेंद्र थोपटे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटनिस तनुजा शहा, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष नदिम सय्यद, युवराज वणवे, ॲड. आदेश गिरमे, ग्रामपंचात सदस्य अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, प्रमोद काकडे, अँड. प्रुथ्वीराज चव्हाण, महेश धायगुडे, अजय सोनवणे, उमेश गायकवाड, अभय थोपटे, बाळा लकडे, संतोष मोहिते, बाळासाहेब गार्डी, सागर शिंदे, अनिकेत सोनावणे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल धुमाळ, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला माने, रयत शिक्षण संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:
Post a Comment