नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार
नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार
पुरंदर:
महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान व लोकशाही दिनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे मंडल अंतर्गत नीरा येथे सोमवारी (दि.२१) या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये वेग-वेगळया मंडलस्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरीकांच्या विविध विभागाच्या अडीअडचणी, तक्रारी, समस्या जाणून घेऊन त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्याच्या सुचना संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याना दिल्या जात आहेत. नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाही दिनात मांडाव्यात असे आव्हान पुरंदर महसूल विभागाने केले आहे.
या लोकशाही दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामध्ये नागरीकांना लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉनक्रिमीलीयर, वय राष्ट्रीय आधिवास व प्रमाणपत्र १५ वर्ष वास्तव्याचा दाखला, अशा विविध प्रकारच्या दाखल्याचे मा. उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुय्यम शिधा पत्रिका, वारस नोंदी, फेरफार निर्गती, आधार कार्ड रजिस्ट्रेशन इत्यादींचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी नीरेतील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जास्तीत जास्ती नागरीकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खालील सुविधा देण्यात येणार आहेत
१) संजय गांधी योजना नवीन लाभार्थ्यांची निवड करणे व फॉर्म स्वीकारणे
२) रेशन कार्ड मधून नावे समाविष्ट करणे व वगळणे
३) दुबार रेशनिंग कार्ड काढणे
४) विविध योजनांचे अर्ज स्वीकारणे
५) उत्पन्न दाखले
६) जातीचे दाखले
Comments
Post a Comment