नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवदजवळ एका नाल्यामध्ये स्कॉर्पिओ अडकली असून त्यामध्ये असलेले 6 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
सतरापूर आणि नांदा गावांमधून वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहात असताना स्कॉर्पिओ चालकानं गाडी नेण्याचं भलतं धाडस केलं. मात्र पाण्याचा मोठा लोंढा आला आणि स्कॉर्पिओ वाहून गेली. एका खडकाला गाडी अडकली मात्र त्यातून प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, असं दृष्यांवरून दिसतंय.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यातील कुणी बचावलं असण्याची शक्यता फारच कमी असल्याचं मानलं जातंय. या धक्कादायक घटनेमुळे भलतं धाडस कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
हे सुद्धा वाचा