Type Here to Get Search Results !

गारडे धरण १०० टक्के भरले

 गारडे धरण १०० टक्के भरले 



सासवड  दि. ८

  

         पुरंदर तालुक्यातील सासवड शहराला पाणीपुरवठा  करणारे गाराडे धरण. आता १०० टक्के भरले असून  आता धरणाच्या संडव्यातून कऱ्हा नदीत पाणी वाहू लागले आहे.

  ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण  आता १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या धरणातून कर्‍हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्‍यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग चालू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली.


कर्‍हा नदीवरील गराडे धरणातून सासवड शहरासह गराडे गावासह कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्‍हा नदी प्रवाहित होत गराडे धरण 100 टक्के भरले आहे.


दुसरीकडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी पूर्व भरून वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे या परिसरातील राहणार्‍या नागरिकांचा तसेच गुरे-ढोरे, बकर्‍या, वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.


सोमवारी अखेर सासवड परिसरात 3 मिलिमीटर, जेजुरी 2 मिलिमीटर, भिवडी 2 मिलिमीटर, परिंचे 1 मिलिमीटर इतका पाऊस पडला. तर राजेवाडी, वाल्हे, कुंभारवळण हद्दीत पावसाची नोंद झाली नाही, असे पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक विनोद साबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies