ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांची तुरुंगात रवानगी

 ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांची तुरुंगात रवानगी

ठेकेदाराच्या तक्रारीनंतर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई



बारामती 

  . पुण्याच्या बारामती तालुक्यातील पळशी गावात ग्रामसेवकाचे काम करणाऱ्या ग्रामसेवकाने ठेकेदाराकडून कामाचे बिल काढण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाच घेतलीय. याच कारणावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी या ग्रामसेवकावर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलय. त्याला न्यायालया समोर हजर केल असता न्यायालयाने त्याची रवानगी तीन दिवसासाठी पोलिस कस्टडीत केलीय .कांतीलाल बापुराव काळाणे अस या लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाच नाव आहे. पळशी येथे बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने ठेकेदाराकडे 2 टक्के रकमेची मागणी केली होती.या संदर्भात ठेकेदार अतुल रामदास भिलारे याने वडगाव निंबाळकर पोलिसात स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती .यानंतर ही कारवाई करण्यात आलीय..


  याबाबत वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कांतीलाल बापुराव काळाणे (वय58 वर्ष) हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पळशी गावामध्ये ग्रामसेवक म्हणून काम करतात तर फिर्यादी अतुल रामदास भिलारे हे ठेकेदार म्हणून काम करतात. यांनी पळशी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये साठवण बंधाऱ्याचे काम केलं होतं. साठवण बंधाऱ्याच्या कामाचं बिल काढण्यासाठी आरोपी कांतीलाल काळाने यांनी ठेकेदाराकडे तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पंचायत समक्ष पंचवीस हजार रुपये देण्याबाबत तडजोड करण्यात आली होती.ती दोघांनीही मान्य केली होती. यानुसार संबंधित ठेकेदार आणि पंच यांनी ही रक्कम ग्रामसेवकांना पळशी येथे पाण्याच्या टाकी जवळ सात मे रोजी सकाळी त्यांच्या अल्टो कार मध्ये दिली होती. ग्रामसेवकांनी ही रक्कम स्वीकारल्यानंतर भिलारे यांनी याबाबतची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. यानुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबाबतचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक अमोल भोसले हे करीत आहेत .  


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..