Type Here to Get Search Results !

खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा.

 खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट

    

पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा. 
पुरंदर  : 

       बारामती तालुक्यातील निंबुत येथे आज शुक्रवारी खा. शरद पवार यांनी माजी खासदार स्वर्गीय संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी काकडे यांचे पुत्र पृथ्वीराज काकडे, जयराज काकडे, मेघराज काकडे व काकडे कुटुंबातील जेष्ठांची भेट घेत पवार यांनी त्यांचं सांत्वन केले. 


   माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथील काकडे कुटुंबांतील माजी खासदार स्व.संभाजीराव काकडे यांच्या पत्नींचे कांठवती काकडे यांचे नुकतच निधन झाले. यानंतर आज शुक्रवारी पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे, संचालक राहुल शामराव काकडे, सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे उपस्थित होते.         निंबूतचे काकडे हे शरद पवार यांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात. आज पर्यंत शरद पवार यांनी काकडे कुठुंबियांची कधीही भेट घेतली नव्हती. जवळपास ५५ वर्षांनी शरद पवार हे काकडे कुटुंबीयांच्या भेटीला आले होते. मात्र यावेळी बदलेली राजकीय परिस्थिती. पाहता पवार यांच्या या भेटीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे.

पवारांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. शरद पवारांच्या विरोधात ॲड. विराज काकडे तर अगदी २०१९ च्या निवडणुकीत ही संभाजीराव काकडे यांच्या सुनबाई मृणालिनी जयराज काकडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. जवळपास ५५ वर्षांनी शरद पवार हे काकडे यांच्या भेटीला आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies