माजी आमदार संभाजीराव कुंजीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार
अजित पवार यांची घेतली पुण्यात भेट
सासवड तां ८: पुरंदरचे माजी आमदार संभाजी राव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार् यांच्या पुणे येथील जिजाऊ बंगला या निवासस्थानी त्यांची भेट घेतली,
ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत बैठक झाली, यावेळी, सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहनशेठ वांढेकर, पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळुतात्या यादव, शिवसेना युवा नेते प्रवीण कदम, गुर्होळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, आदी उपस्थित होते.
माजी आमदार कुंजीर यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा तालुक्यात रंगली आहे, गेली अनेक वर्षे
ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून १९८० साली ते निवडून आले होते, श्री कुंजीर यांच्या बरोबर तालुक्यातील अनेक गावातील आजी माजी सरपंच व पदाधिकारी प्रवेश करणार आहेत,