दिवे येथे एका व्यक्तीचा धारधार हत्याऱ्याने करण्यात आला खून ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल
सासवड : दि.२५
पुरंदर तालुक्यातलं दिवे येथील भापकरमाळा येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा खून करण्यात आला आहे. या बाबत सासवड पोलिसात मयताच्या पत्नीने फिर्याद दिली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम ३०२व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की.या बाबतलता अशोक भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी संजय बबन भापकर, व किरण झेंडे (दोघे रा.दिवे ता.पुरंदर) यांनी अशोक लक्ष्मण भापकर (वय ५६ रा.भापकर मळा) याचा धारदार शस्त्राने खून केला आहे. दि २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास भापकर मळा येथे फिर्यादीच्या घराजवळ तिचे पती अशोक लक्ष्मण भापकर यांना संजय बबन भापकर व किरण झेंडे यांनी काळेवाडीच्या ढाब्यावर झालेल्या भांडणाचे कारणावरून घरी येवुन पतीला बाहेर बोलावले व कसल्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करून त्यांचा खुन केला. गटाने नंतर घटनास्थळाला सासवड भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे तर पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत