अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त वीर येथे शालेय साहित्याचे वाटप
वीर दि.२२
राज्याचे माजी उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त आज शुक्रवार दि.२२ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे त्याच बरोबर माळवाडी,रामोशीवाडा,समगीर वाडी,बनकरवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळपास २२५ रायटिंग पॅडचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीर व सोमेश्वरच्या माजी संचालक सौ ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्यावतीने करण्यात आले हे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे, तर पुणे जि.मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे ,मा.जि.अध्यक्ष विजयराव कोलते,आदर्श जि.प.सदस्य हेमंतकुमार माहूरकर, आदर्श जि.प.सदस्य सुदामआप्पा इंगळे,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव,सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मा. संचालिका सौ.ऋतूजाताई धुमाळ,ज्येष्ठ नेते श्री राजेंद्र धुमाळ, श्री विश्वासनाना जगताप, गावातील ग्रामस्थ राजेंद्र शिंदे ,अनिरुद्ध धुमाळ मणेश कुंभार सुजित धुमाळ सोमनाथ धुमाळ व लपतळवाडीचे उपसरपंच रवींद्र मोरे व सुहास पिलाणे व सर्व शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विजयराव कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्रबापू धुमाळ,रेणुका मस्के यांनी केले व आभार रामोशीवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका बोरावके मॅडम यांनी मानले