परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.
नीरा : दि.१८
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी नंतर आता परतीचा प्रवास करतो आहे.आज (दि.१८) हा सोहळा पाडेगाव येथील मुक्काम.आटोपून पुणे जिल्ह्याच्या दिशेने निघाला.आहे त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. 'माऊली माऊलीच्या गजरात माऊलींच्या ' पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.
सातारा जिल्हयातील पाडेगाव येथील कालचा मुक्काम होता. आज सोमवारी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुखांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब रणदिवे चोपदार, दिनकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 'माऊली माऊलींच्या' जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना ठिक सव्वानऊ वाजता स्नान घातले.
माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्या सोबत आलेले पुरुष विणेकरी व तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथा मागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात मोठय़ा उत्साहात व शांतते पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत विठ्ठल मंदिरात विसाव्यासाठी ठेवण्यात आली.