सरकारने नोकरी देणे बंद केले आहे. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात यावे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे
जेजुरी वार्ताहर दि २३ सरकारने शिक्षणावरील खर्च कमी केला आहे. सर्वच क्षेत्रात नोकऱ्या देणे बंद केले आहे. सरकारच्या नोकरीची वाट न पाहता तरुणांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे व या व्यवसायातून इतरांना नोकरीची संधी निर्माण करून द्यावी असे आवाहन माजी कुलगुरू आणि कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूरचे संस्थापक डॉ.पंडितराव पलांडे यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील श्री मल्हार शिक्षण मंडळ व विद्या महामंडळ प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नितीन राउत व काशिनाथ भोंग यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमा वेळी डॉ पंडितराव पलांडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे,कार्यध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सासवड बार असोशिएशनचे अध्यक्ष अड धनंजय भोईटे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले,सामाजिक कार्यकर्ते अड नितीन कुंजीर,सरपंच शहाजी जगताप,माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप आदी उपस्थित होते. यावेळी श्री मल्हार शिक्षण संस्था,विद्या महामंडळ प्रशाला,कोथळे ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी संघटना ,आदी विविध संस्थाच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक नितीन राउत,काशिनाथ भोंग यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे म्हणाले की, शाळांबाबत शासन आपली जवाबदारी झटकत आहे. शिक्षक भरती होत नसल्याने अनुदानित शाळेवर संकट आले आहे. शाळेत घेतलेल्या शिक्षकांना पगार कसे द्यावेत हा प्रश्न संस्था चालकांसमोर आहे.शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. असे सांगून त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना शुभेछ्या दिल्या.
यावेळी पांडुरंग सोनवणे,अड नितीन कुंजीर, ज्ञानेश्वर भोईटे,शंकरनाना जगताप,डॉ सुरेश उबाळे, प्रल्हाद पवार ,संदीप जगताप,सचिन भोसले आदींची भाषणे झाली. संस्थेचे पदाधिकारी पी एम जगताप,ज्ञानेश्वर जगताप,विजय जगताप,सुरेश खैरे,रवींद्र जगताप,खुशाल कुदळे,बबन भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ देवकर तर आभार केलास भोसले यांनी मानले.