शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी

 शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी


कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना करण्यात आले अभिवादन



     दि.२६


         आज दि.२६ जुलै रोजी  देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदे यांच्या पिंगोरी गावात सुद्धा आज कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले.

            पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी मध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज गावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारगिल मध्ये झालेल्या लढाईत पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे यांना वीरमरण आले होते. लढाई सुरू असताना रणांगणामधून त्यांनी आपल्या पत्नीला  पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची आठवण आज पिंगोरकरांना पुन्हा आली युद्धभूमीवर असताना त्यांनी लिहिलेले पत्र म्हणजे मरणापूर्वीच त्यांनी आपले मरण पाहिले होते असे दिसते. त्यांनी लिहिलेल्या या ओळी आजही पिंगोरीकरांच्या  डोळ्यात पाणी आणतात. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं होतं की,

      "हे पत्र मी डोंगरावर बसून लिहीत आहे , माझ्या आवती भवती शत्रूंच्या तोफेतून सूटलेले गोळे फुटत आहेत. या धूमचक्रितून मी वाचेलच अस नाही, काळजी घे.कदाचित माझं हे शेवटचं पत्र असेल"  शिंदे यांच्या पत्रातील या ओळी आज पिंगोरीकरांना पुन्हा आठवल्या.



  अभिमानाने भरलेला छातीनं आणि अश्रुनी भरलेल्या नयनांनी आज पिंगोरीकरांनी या वीराला अभिवादन केलं. यावेळी माजी सैनिक कॅप्टन शामराव शिंदे, अंकुश शिंदे, निवृत्त पोलीस सदाभाऊ शिंदे यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पिंगोरीचे उपसरपंच प्रकाश शिंदे, सोसायटीचे चेअरमन कैलास गायकवाड,पोलीस पाटील राहुल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप यादव, शहीद शंकर शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, प्रवीण शिंदे, शरद ताकवले, शशिकांत चौधरी, कांताराम शिंदे महादेव शिंदे, माजी उपसरपंच धनंजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.