कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल
कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वे गाडीने गुरवारी नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री अचानक 5 तासांचा ब्लॉक घेतला .यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच परीक्षेसाठी निघालेले परीक्षार्थी व आजारी असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. येथील रेल्वे प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.दरम्यान येथील कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्थानिक तरुणांना मदतीला घेत या प्रवाशांना मदत पोचविण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली गेल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चिडचिड वाढल्याचा पाहायला मिळाले
दिनांक 28 जुलै रोजी पुणे कोल्हापूर रेल्वे लईन काही कामानिमित्त दिवस भर बंद ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी कोल्हापूर वरुन गोंदिया ला जाणारी गाडी नंबर 11039 या रेल्वे ने तब्बल नीरा रेल्वे स्टेशन वर चक्क 5 तासांचा ब्रेक घेतला. प्रवाशांनी आणि कोल्हापूर वरुन पुण्यामध्ये परीक्षेला जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रेल्वे मास्टर यांना विचारणा केली असता त्यांनी पुढे डबल लाईनचे काम चालू आसलेल्या कारणामुळे रेल्वे कधी निघू शकेल याची खात्री नाही आसे सांगत प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी दिसून आली. याच वेळी नीरा रेल्वे स्टेशन मध्ये एकच पोलिस अधिकारी उपलब्ध होते. दरम्यान त्यांनी गावातील काही सामाजिक कार्यातील युवकांची मदत घेत प्रवाशांना पाणी, चहा, वडापाव मिळण्यासाठी मदत केली. याच वेळी रेल्वेतील 2 प्रवाशांना अचानक त्रास होत होता त्यांना गावातील युवकांच्या मदतीने दवाखान्यात जाण्यास मदत देखील केली. दरम्यान त्या पेशंट च्या नातेवाईकांनी पोलिस महेश निर्मळ यांचे आभार मानले. यानंतर रात्री उशिरा रेल्वे ने तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 5 तासांनंतर धाव घेतली.