अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
निरा ःप्रतिनिधी दि 22
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेतेअजितदादा पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचनदादा निगडे देशमुख यांनी निरा-शिवतक्रार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले .
यावेळी आपल्या मनोगतात कांचन दादा यांनी अजितदादा पवार यांच्या शैक्षणिक कामातील भरीव योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.उपाध्यक्ष राजेश चव्हाण, पुणे जिल्हा काँग्रेस ओ बी सी सेल अध्यक्ष राजेंद्र बरकडे ,निरा शिवतक्रार ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे ,प्रगती पत संस्थेचे संचालक अरविंद जेधे उपस्थित होते
मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
संदीप धायगुडे यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शाळा शिवतक्रारचे दुरुस्ती काम चालू असुन याकामी आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं .
मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं, तर आभार विद्यार्थी शिवराज जेधे याने मानले