वीर धरणातून आज १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरु.
वीर धरण ९८.९१ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार.
नीरा : १६
नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही, परिणामी आता भाटघर धरण ५४.३१ टक्के, नीरा-देवधर ४७.७४ टक्के, वीर धरण ९८.९१ टक्के, तर गुंजवणी धरण ७४.०१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाचे तीन दरवाजे एका फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिल्याने धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रात्रभर नीरा नदीपत्रात एकून ६ हजार १६८ क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. आज शनिवारी ही दिवसभर संतधारा सुरुच आहेत. वीर धरणात पाणी वाढतच आहे. शनिवारी दुपारी वीर धरण ९८.९१ टक्के भरले आहे. तसेच धराणीची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने शनिवारी दुपारी ४ वाजता ९ हजार १४४ क्युसेक्सने विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे नीरा नदिच्या पात्रात दुपारी चार नंतर १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आता नीरा नदी दुथडी भरुन वाहणार असुन नदीचे सर्व बंधारे भरणार आहेत.
नीरा पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल आहे. नदिवलील बंधारे, छोटे पुल, तसं नदी तीरावरील मंदिरे, स्मशानभूमीत वावर असणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.