पुरंदर पंचायत समिती आरक्षणाने दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी बांधले गुढग्याला बाशींग
नीरा :
पुरंदर पंचायत समितीत पुर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे पुरंदर पंचायत समितीत आता सदस्य संख्या दहा झाली आहे. पैकी पाच सदस्य महिला राखीव आहेत. सर्वसाधारण महिला दोन जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन जागा, अनुसूचित जाती महिला एक जागा, सर्वसाधारण जागेसाठी तीन जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा राखीव असे आरक्षण सोडत झाली आहे. या अनपेक्षित सोडती मुळे तालुक्यातील काही दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी आताच गुढग्याला बाशींग बांधण्याची तयारी सुरु केली आहे.
आज गुरवारी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्रा उपस्थित चिठ्ठ्या टाकून रोटेशन पद्धतीने आरक्षण सोड करण्यात आली.
पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुक 2022
गण आरक्षण
परींचे = सर्वसाधारण
मांडकी = नागरिकांचा मागास प्रवर्ग
बेलसर = सर्वसाधारण
कोळविहिरे = सर्वसाधारण
पिसर्वे = सर्वसाधारण महिला
माळशिरस = सर्वसाधारण
वाल्हे = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
निरा = नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
दिवे = अनुसूचित जाती महिला
गराडे = सर्वसाधारण महिला