Monday, July 18, 2022

वाल्हेकरांवर संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही

 वाल्हेकरांवर  संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही



वाल्हे. दि.१८




संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात असतो. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजचा मुक्काम या विद्यालयात न करता दौडज येथील भैरवनाथ मदिरत  केला आहे.


आज सायंकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामासाठी आला होता मात्र वाल्हे येथे मुक्काम न करता हा सोहळा मुक्कामासाठी दौंडज येथे गेला. दरम्यान वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखी सोहळा प्रमुखांना वाल्हे येथेच  मुक्काम करण्याची विनंती केली होती. मात्र नाराज झालेल्या पालखी सोहळ्यातील कारभाऱ्यांनी वाल्हे ते मुक्काम न करता पालखी सोहळा दौंडज येथे नेला. यानंतर  दौंडज येथील  मंदिरात पालखी सोहळ्याचे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेकरांवर रुसण्याची ही दुसरी वेळ आहे. माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे येथे आल्यावर   खांद्यावर पालखी घेऊन गावातून जात असतो. ही प्रथा सुद्धा बंद करण्यात आली आणि आता  आजचा मुक्काम न करता पालखी सोहळ्याने दौंडज येथील  भैरवनाथ मंदिरामध्ये  मुक्काम केला. ग्रामस्थांनी वादानंतर  विनंती केली होती. मात्र या विनंतीकडे सोहळा चालकांनी दुर्लक्ष करून वाल्हेकरांवर राग आळवला आहे. दरम्यान याबाबत सोहळा प्रमुखंकडे विचारणा केली असता .मुक्कामाच्या ठिकाणी खोल्या लवकर उपलब्ध न करून दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...