दिवे घाटात खड्ड्यांचे साम्राज्य ; वाहन चालकांना करावी लागते कसरत
पुरंदर दि.१७
पुरंदर तालुक्यात पुणे येथून येत असताना लागणारा अवघड चढणीचा आणि तीव्र वळणांचा दिवेघाट हा वाहन चालकांसाठी सध्या कसरतीचा मार्ग बनला आहे. दिवेघाटात दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाळ्यात खड्डे पडलेले आहेत .आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खड्ड्यात चुकवताना वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यात वाहने आपटून वाहनांचाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. चार चाकी दुचाकी चालकांना तर या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे या खड्यांमध्ये आधळून वाहन चालकांचे अपघात देखील होत आहेत. दुचाकी स्वरांना रात्रीच्या अंधारामध्ये व पावसामध्ये या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि या खड्ड्यांमध्ये वाहने आपटत आहेत. परंतु या कशाचीही फिकीर प्रशासनाला राहिलेली नाही. पाऊस पडला आणि सालाबाद प्रमाणे खड्डे देखील आता घाटामध्ये पडलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसा पूर्वीच दिवे घाटातून गेलेला आहे. पालखी सोहळा पूर्वी जी नियोजन बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग पप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे गोडवे गायले होते. या ठिकाणी खड्डे बुजवलेले आहेत घाट आधी चकाचक झालेला आहे आणि आता सुकर प्रवास होणार आहे. अशा पद्धतीने गोडवे गायले जात असताना आज जर परिस्थिती बघितली तर आत्ता कुठे पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तरच घाटामध्ये खड्ड्यांचा साम्राज्य झाले आहे. तीव्र वळणांवरती अगोदर समोरून येणारे वाहन बघायचं, की खड्डा बघायचा की वाहन चालवायचं अशी परिस्थिती आता वाहन चालकांची झालेली आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित प्रशासनाच याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे.वाहन चालक देखील तक्रारी करतात परंतु प्रशासन ढिम्मच आहे आणि या प्रशासनाच खरच या गंभीर बाबीकडे लक्ष जाणार का? हा प्रश्न आता या रस्त्याने रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून विचारला जातोय. एकंदरीत आत्ताच पावसाळा चालू झालेला आहे पावसाचा जोर वाढल्यानंतर मात्र घाटातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळून झाल्याशिवाय राहणार नाही आणि या खड्ड्यांमध्ये आपटून एखाद्या वाहन चालकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तात्काळ खड्डे बुजवावेत व या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे