पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

 


मुंबई : बऱ्याचदा शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे फटका बसतो.

काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. त्यामुळे पिकांचंच नुकसान झालं तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून हा प्रश्न असतो. मग अशावेळी पिकाचा विमा देखील उतरवला जातो. ज्यामुळे नुकसान झाल्यास सरकारकडून त्याची एक ठरावीक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. पिकाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना बराच काळ वाट पहावी लागते. दरम्यान, त्यांना सिंचन, तण व इतर कामांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात आणि पीक तयार असतानाही कापणी व वाहतुकीसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामात पीक घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर वादळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा पडू शकतो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. पीक विमा योजनेत विमा मिळाला तर त्याचा लाभ घेता येईल. सध्या रब्बी पिकांचा विमा उतरविला जात असून 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर लवकर ही नोंदणी करून घ्यावी अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

खरीप, रब्बी आणि व्यावसायिक किंवा बागायती पिकांचा प्रीमियम पाऊस, पूर, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याची माहिती 72 तासांच्या आत द्यावी लागते. टोल फ्री क्रमांक, ईमेल, कृषी कार्यालय आणि इतर माध्यमातून तुम्ही कृषी विभागाला ही माहिती देऊ शकता. खरीप, रब्बी आणि व्यावसायिक किंवा बागायती पिकांचा प्रीमियम 2, 1.5 आणि 5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभया योजनेअंतर्गत शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. सहकारी बँका किंवा किसान क्रेडिट कार्डकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऑटोमेटिक विमा मिळतो. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे सहकारी बँकांची कर्जे नाहीत, अशा शेतकऱ्यांनाही लाभ दिला जातो.

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ कमी पाऊस झाल्यास, अथवा प्रतिकुल हवामान नसल्याने पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळतो अवकाळी पाऊस, महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान गोठ्यात किंवा शेतात ठेवलेल्या पिकावर चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा परिणाम झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..