सोलापूर, : बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप
कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का
मानला जात आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने शिवसेना आणि
राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते
आधीच शिंदे गटात सामील झाले आहे.
आता राष्ट्रवादीचे नेतेही प्रवेश
करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये
प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सात
वाजता वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत
विश्वास मांणले जात होते.
दिलीप कोल्हे आपल्या
कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून
दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना
झाले आहे. अक्कलकोटमधील ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्तेचा शिंदे गटात दरम्यान, मागील आठवड्यातच अक्कलकोट तालुका
शिवसेनाप्रमुख संजय देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
वर्षा शासकीय निवासस्थानी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या
उपस्थितीत तालुका प्रमुख संजय देशमुख, योगेश पवार, प्रा.सुर्यकांत कडबगावकर
यांच्यासह तीस पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची
शिवसेना पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी
उद्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला होता. अडीच
वर्षांपासून कोणतेच काम न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
त्यामुळे आम्ही पक्षात पदाचा राजीनामा देत आहोत, असे तालुका प्रमुख संजय देशमुख, अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार
यांनी सांगितले होते.