पांचाळ, गायकवाड यांना ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार

 पांचाळ, गायकवाड यांना ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार

जयमल्हार ग्रामीण विकास संस्थेच्या वर्धापनदिनी होणार सन्मान सोहळा




नीरा 

       जयमल्हार ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वार्षिक वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मार्तंड भूषण’ पुरस्कार यंदा दिग्दर्शक प्रकाश पांचाळ आणि कार्यशील समाजसेवक शिक्षक सुशील गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजी पुरंदर येथील असेंड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेच्या वतीने राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. याआधी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, खेळाडू, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यंदा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शन व पटकथा लेखनाच्या कौशल्याने ठसा उमटविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश पांचाळ यांना ‘मार्तंड कला रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रात विज्ञान प्रयोगशीलतेचा ध्यास घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करून यशाच्या मार्गावर नेणारे कार्यशील शिक्षक सुशील गायकवाड यांना ‘मार्तंड शिक्षणरत्न’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई असतील. प्रसिद्ध उद्योजक राजकुमार धुरगुडे, मराठी मालिका व चित्रपट अभिनेत्री लक्ष्मी कांबळे, परमपूज्य मोहनसिंग राजपूत तसेच दिग्दर्शक-पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी पुरंदर असेंड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक सोमनाथ खोमणे यांनी दिली. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू