“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार

“२४ तास काम हाच आमचा अजेंडा; पुरंदरचा अखंड विकासच आमची ताकद” – प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचा निर्धार 



पुरंदर : 


     “निवडणूक आली म्हणून काम नाही, तर पाच वर्षे—बाराही महिने पुरंदरच्या विकासासाठी झटणे हाच आमचा अजेंडा आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित सभेत केले. 


      कडक उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहून, “शिवसेनेचा निष्ठावंत, शंभर टक्के बांधिल कार्यकर्ता आजही ताठ उभा आहे,” असा विश्वास शिवतारेंनी व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, “२४ तास काम आणि पुरंदरचा अखंड विकास हीच आमची एकमेव स्ट्रॅटेजी आहे,” असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. 


यावेळी उमेदवारांचा उल्लेख करत, “हे फक्त उमेदवार नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा धनुष्यबाण आहे,” असे सांगण्यात आले. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात २४ तास सहभागी असतो, असेही त्यांनी नमूद केले. 


    विरोधकांवर जोरदार टीका करताना शिवतारे यांनी सांगितले की, “५० वर्षे काँग्रेस–राष्ट्रवादी सत्तेत असूनही पुरंदरसाठी एकही ठोस काम करता आले नाही.” गुंजवणी धरण आणि पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या आंदोलनांचा उल्लेख करत, “२.०२ टीएमसी पाणी हे पुरंदरचे हक्काचे आहे, हे महाराष्ट्राला कळले,” असे सांगण्यात आले. या लढ्याची किंमत स्वतःच्या आरोग्याने मोजावी लागली, तरी विकासाचा ध्यास सोडला नाही, असे भावनिक आवाहन करण्यात आले. 


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा लाईनला गती मिळाली असून, आज ८८२ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता मिळाल्याचे सांगण्यात आले. “पाच वर्षांत विरोधकांनी एक इंचही काम केले नाही, मात्र आम्ही ७–८ महिन्यांत २३ किलोमीटर लाईन पूर्ण केली,” असा दावा यावेळी करण्यात आला.

आज पिसर्वे, माळशिरस, मावडी क.प सारख्या भागांत टँकर ऐवजी शेतीला पाणी मिळत असून, ऊस उत्पादन वाढल्याने शेतकरी समृद्ध झाला आहे. मजुरीसाठी बाहेर जाणाऱ्या माता-भगिनी आता स्वतःच्या गावात सन्मानाने जगत असल्याचेही शिवतारे यांनी अधोरेखित केले. 


      सभेच्या शेवटी मतदारांना आवाहन करत, “शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार व पंचायत समितीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.