निरा - कोळविहीरे गटातून सिमा धायगुडेंच्या प्रचाराचा झंजावात ! वाल्हे गावात आज रॅली, गटात विकासकामे करण्याचा संकल्प

 निरा - कोळविहीरे गटातून सिमा धायगुडेंच्या प्रचाराचा झंजावात ! 


वाल्हे गावात आज रॅली, गटात विकासकामे करण्याचा संकल्प 



पुरंदर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहत आहे. निरा- कोळविहीरे गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सिमा संदिप धायगुडे यांनी जोरदार प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात वेगात सुरु झाला आहे. 


      गावभेटीवेळी सिमा धायगुडे यांना चांगला प्रतिसाद मिळत असून धायगुडे दांपत्यावरील लोकांचे प्रेम प्रचारावेळी दिसून येत आहे. महिला, शेतकरी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध प्रश्नांची त्यांना माहिती आहे. समाजसेवेच्या अनेक कामांत त्या संदीप धायगुडे यांसह हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. 


      प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांना चालना, बळीराजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. 



        नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा प्रभाव पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर सकारात्मक होत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेकांनी सिमा धायगुडे व त्यांचे पती संदीप धायगुडे यांचे अभिनंदन करून 'आम्ही सोबत आहोत' चा त्यांना शब्द दिला आहे. 


     निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंदरराव धायगुडे यांच्या सिमा धायगुडे सुनबाई आहेत. चंदरराव धायगुडे यांचा निरा पंचक्रोशीतील गावांसह तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. वेळेला धावून येणारे व्यक्तीमत्व म्हणून काकांकडे पाहिलं जातं. 


       ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे हे सिमा यांचे पती असून गेली अनेक वर्षे ते समाजकारण व राजकारणात सक्रीय आहेत. निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे ते सदस्य असून विविध व्यवसाय व उद्योगांच्या माध्यमातून हे पती पत्नी सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले आहेत. अडचणीत असणाऱ्या अनेकांना या दांपत्याने मदत केली आहे. त्यामुळे एक मोठा जनसमुदाय सिमा धायगुडे यांच्या पाठीशी दिसून येत आहे. निरेतील प्रभाग पाच मधील अनेक प्रश्न संदीप धायगुडे यांनी पोटतिडकीने मांडले व त्यांची सोडवणूक केली. पतीच्या कार्यात पत्नीचा वाटा सिंहाचा असतो. आपल्या पतीच्या सामाजिक व राजकीय सेवेदरम्यान त्यांना आधार देत त्यांच्यासोबत उभी राहत अनेकांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सिमा धायगुडे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांना जनतेचा चांगला पाठींबा मिळत असल्याचे चित्र सध्या तरी आहे. 



       भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून सिमा संदीप धायगुडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. संकटकाळात जो धावून येतो मदतीला उभा राहतो तो खरा समाजसेवक व धडाडीचा नेता असतो. संदीप धायगुडे व सिमा धायगुडे यांनी आजवर शेकडो लोकांना मदत केली आहे. विकासासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. ते नक्की निरा- कोळविहीरे गटाचा विकास करतील." 


- सिमा निगडे, सामाजिक कार्यकर्त्या, गुळुंचे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.