सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा नीरा दि.१ नीरा (ता.पुरंदर) येथील सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञान दिन साजरा केला.यामध्ये विज्ञानातील विविध तत्त्वे, ऊर्जेचा नियम, प्रयोगशाळेतील साहित्य, पर्यावरण रक्षण अशा विविध विषयांवर आधारित रांगोळीचे वर्गासमोर व घरासमोर देखील रेखाटन करण्यात आले. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकटरमन यांनी भारतातील रमन परिनामाचा शोध लावला .तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे रमण यांनी संगीत वाद्यांच्या ध्वनिशास्त्रावरही काम केले. त्यांच्या या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून भारतात सर्व महाविद्यालये ,विद्यापीठे व शिक्षण संस्था हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. नीरा येथील कन्या शाळेमध्ये द...