जेऊर येथील महिलेचा सासरच्यांकडून पैशासाठी छळ, पोलिसात गुन्हा दाखल

 

जेऊर येथील महिलेचा सासरच्यांकडून  पैशासाठी छळ, पोलिसात गुन्हा दाखल



नीरा दि.२७

     पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील महिलेचा सासरच्यांकडून  पैसे आणण्यासाठी छळ केल्या प्रकरणी नीरा दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९८(अ) ३२३, ५०४,५०६, आणि ३४ नुसार पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, याबाबत जेऊर येथील विवाहित महिला पुनम निलेश गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारी नुसार १३/१२/२०२० ररोजी तिचा विवाह जेऊर येथील निलेश गायकवाड यांचेशी झाला होता.विवाहा नंतर दोन महिने संसार चांगला सुरु होता. मात्र त्यानंतर तिला आपल्याला मोटार सायकल घ्यायची माहेराहून पैसे आण असे म्हणुन तिचे निलेश गायकवाड पती, सासु उल्का नारायण गायकवाड, सासरे नारायण मारुती गायकवाड व दिर गणेश नारायण गायकवाड़ यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर फिर्यादी  व तिचे  पती जेजुरी येथे राहण्यास गेले . महीनाभर संसार व्यवस्थीत चालु होता, अधुनमधनु सासु, सासरे हे त्यांचेकडे येवून चार ते आठ दिवस राहत असे व सासु तिला  तुझ्या आई वडीलांनी माझा मुलगा निलेश यास लग्नामध्ये केलेले नाही व त्याचा त्याचे लायकी प्रमाणे सन्मान केला नाही. असे म्हणुन टोचुन बोलुन तिचा  व तिच्या आई वडीलांचा  अपमान  करीत असे.त्याच  बरोबर  दिर गणेश नारायण गायकवाड हा सुध्दा आधुन मधुन त्यांच्यकडे जात असे व खर्चासाठी फिर्यादीकडे पैशाची मागणी करत असे व फिर्यादीला अपमानित  करत असे व तिचेकडुन शिवीगाळ दमदाटी करून पैसे घेत असे.अशा  प्रकारची तिने  फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिकच तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भापकर करीत आहेत.  

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..