पिंगोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश शिंदे यांची बिनविरोध निवड.
सरपंचपद ओबीसी राखीव असल्याने आता उपसरपंच करणार ग्रामपंचायतीच्या कारभार.
पिंगोरी दि.२१
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडनुकित प्रकाश रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील महिन्यात पिंगोरी येथील निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या तरुणांनी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस निलेश शिंदे , रुपेश यादव, सचिन शिंदे,महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत स्वतंत्र पॅनलची स्थापना केली होती. या पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले होते. आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवणुकित प्रकाश शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी गावच्या विकासासाठी आघाडी धर्म पाळत प्रकाश शिंदे यानां पाठिंबा दिला.आणि निवडी बद्दल अभिनंदन केले.
आज दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पिंगोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पारपडली.सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने व याबाबत शासकीय पातळीवर कोणताही निर्णय नझाल्याने उपसरपंच पदाची निवड करून त्याच्या मार्फत कारभार करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज निवणुक प्रक्रिया पार पडली. सकाळीसाडे आकरा वाजता प्रकाश शिंदे यांनी उमेवारी अर्ज दाखल केला .त्याला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जीवन शिंदे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी निवड नुकनिर्णय अधिकारी म्हणून गोपाळ लाखे यांनी काम पाहिले तर अनिल हिरसकर यांनी त्यांना सहाय्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप यादव,भाग्यश्री प्रवीण शिंदे,अनिता शिंदे ज्योती शिंदे सुषमा भोसले इत्यादी उपस्थित होते. निवडी नंतर ग्रामस्थांच्यावतीने पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी प्रकाश शिदे यांचा सत्कार केला.यावेळी माजी सरपंच हरिश्चंद्र यादव, ठकसेन भोसले,निलेश शिंदे रुपेश यादव,मोहन शिंदे,राजेंद्र शिंदे,मिलिंद शिंदे शिंदे,संजय धुमाळ, दत्ता शिंदे,गणेश शिंदे,आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.