पारगाव पिसर्वे भुयारी मार्ग वाहतुकीस खुला
शिवजयंतीदिनी गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा.
नायगाव : दि.२०
पुरंदर तालुक्यातील पारगाव ते पिसर्वे या गावांदरम्यान असणाऱ्या रेल्वेच्या अंडरपासचे काम गेल्या दिड वर्षापासून रखडले होते. हे काम रस्ता वाहतूक चालू करण्याइतपत पूर्ण झाले आहे. आज शिवजयंतीचे औचित्य साधून गुलाल भंडाऱ्याची उधळण करत पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करीत समाधान व्यक्त केले. यावेळी या अपंग विकास संघाचे अध्यक्ष अमोल बनकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक निंबाळकर, अॅड. नितीन कुंजीर, कुंभारवळण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक जावळे, परगावचे माजी सरपंच जितेंद्र मेमाणे, शांताराम सावंत, सुरेश साठे, विक्रांत पवार, अमोल पवार, अॅड. दयानंद कोलते, अॅड. राहुल कोलते, तेजस कोलते, निलेश पवार, प्रवीण सणस, अनिकेत जगताप, बाबुराव जगताप, रोहित काळे, दीपक जगताप, महेंद्र खेडेकर, सागर जगताप व भोसलेवाडी नायगाव राजुरी या गावातील अनेक अनेक तरुण सहकारी उपस्थित होते.